नारायणगाव : (प्रतिनिधी ) नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येडगावच्या गणेशनगर येथील शेतात राहणाऱ्या बारसाबाई दत्तात्रय गावडे यांच्या बंद घराचा दरवाजा भुरट्या चोरट्यांनी उघडून फरशीच्या तुकड्याच्या सहाय्याने लोखंडी कपाटातील लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु कपाटाचे लॉकर न तुटल्याने कपाटातील सहा तोळे दागिने व रोख रक्कम सुरक्षित राहिली. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी दहा ते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, बारसाबाई दत्तात्रय गावडे या गुरुवारी(दि. 31) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घराच्या दरवाजा बंद करून खाजगी कामासाठी बाहेर गेल्या. घराची चावी नेहमीच्या ठिकाणी ठेवली होती.. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या पुन्हा घरी आल्या. त्यांनी चावी घेऊन दरवाजा उघडून पिशवी घरात ठेवली व त्या पुन्हा नारायणगावला दवाखान्यात आल्या. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ते व त्यांच्या घरातील इतर सदस्य घरी येऊन सुरक्षित ठिकाणी ठेवलेली चावी घेऊन पुन्हा दरवाजा उघडला. त्यांचा नातू पार्थ संपत गावडे हा आधार कार्ड कपाटात ठेवण्यासाठी त्यांनी कपाट उघडले असता हा प्रकार त्याच्या लक्षात आला. दरम्यान चोरट्यांनी दगडाच्या (फरशीच्या) साह्याने कपाटाचे लोकर तोडण्याचा प्रयत्न केला परंतु लॉकर तुटले नाही. या भुरट्या चोऱ्यांनी दहा ते दुपारी तीनच्या दरम्यान चोरी करण्याचा प्रयत्न केला असावा असा प्राथमिक अंदाज केला जात आहे. दरम्यान चोरट्यांना जर कपाटाचे लॉकर तुटले असते तर कपाटात असलेले सहा तोळे दागिने व तीस ते चाळीस हजार रुपये रोख रक्कम लंपास झाली असती. परंतु सुदैवाने कपाटातील सोन्याचे दागिने व पैसे वाचले. दरम्याम घटनेची माहिती पोलिसांना देण्यासाठी पार्थ संपत गावडे यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या लँडलाईन फोनवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. “भुरट्या चोरांनी कपाट फोडण्याचा प्रयत्न केला असेल, असे पोलिसाने त्या युवकाला सांगितले. दरम्यान नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भुरट्या चोऱ्या पुन्हा वाढू लागल्या असून लोकांनी आपले दागिने व पैसे घरी न ठेवता बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.