जांभोरी (प्रतिनिधी)
सत् करम फांऊडेशन व भव्य फाऊंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून अंगणवाडी, जि.प. प्राथमिक शाळा जांभोरी व काळवाडी, न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी या शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नरुला साहेब व त्याचप्रमाणे दत्तात्रय सांवत सर, भागीत सर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले. अंगणवाडीच्या मुलांना ड्रेस, वॉटर, बॅग, वही, पेन व पेन्सिल व इ. १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, वॉटर बॅग, ड्रेस तर इ. ८ वी ते१० वीच्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बिरसा ब्रिगेड चे अध्यक्ष सुनिल गिरंगे, शरद बांबळे साहेब, फाउंडेशनचे अध्यक्ष पुनाजी पारधी सर नांदुरुकीची वाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय केंगले सर जि.प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक पारधी सर, न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे मुख्याध्यापक केंगले सर, काळवाडी शाळेचे मुख्याध्यापक साबळे सर, सा. कार्यकर्ते अरुण केंगले, किसन केंगले, लिंबाजी केंगले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले केशव केंगले माजी पी एस आय हर्ष केंगले अंश केंगले उपस्थित होते. आभार श्री. संजय केंगले सरांनी मानले.