वारुळवाडी तरुणीची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी ) वारूळवाडी(ता. जुन्नर ) येथील मानसी मंगेश माळवे (वय 23) या तरुणीने राहत्या घरातील सिलिंग फॅनला ओढणीने फास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
तरुणी आई-वडिलांसमावेत वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चिमणवाडी येथे शेतावर राहण्यास आहे. त्यांचा पोल्ट्री व्यवसाय आहे. आई आजारी असल्याने त्यांच्यावर नारायणगाव येथील डोके हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी आले असता मानसीने घरातील सिलिंग फॅनला फास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. नारायणगाव पोलिसांना माहिती समजताच घटनास्थळी पोलीस हवालदार मंगेश लोखंडे,जितेंद्र पाटील दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

जाहिरात

error: Content is protected !!