जांभोरी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण
जांभोरी येथे जांभोरी ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार व जांभोरी येथील न्यु इंग्लिश स्कूल जांभोरी व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एकुण २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.सुनंदाताई पारधी लोकनियुक्त सरपंच जांभोरी ह्या होत्या.
शालेय साहित्याचे औचित्य साधून श्री. अमोल पोपट वाघमारे यांना जांभोरी ग्राम विकास फाउंडेशनच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.पुनाजी पारधी.उपाध्यक्ष दिलीप गिंरगे ज्ञानेश्वर पारधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी फाउंडेशनचे सर्व संचालक उपस्थित होते.तसेच इयत्ता दहावी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना फाऊंडेशनचे आधारस्तंभ श्री.प्रकाश केंगले साहेब यांच्या कडून अनुक्रमे ३०००/-,२०००/-,१०००/- रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.नियोजित वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले जांभोरी ग्राम विकास फाउंडेशनचे कार्याध्यक्ष लिंबाजी केंगले,तानाजी आंबेकर,दिलीप केंगले, रामचंद्र हिले यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.तसेच डॉ.अमोल वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार श्री.बापु सावळेराम किरवे यांच्या कडून देण्यात आला तर विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्ह श्री.सुरेश केंगले दिले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शंकरशेठ शहा,खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.शामराव बांबळे,प्रा.रूपेश केंगले, नवनाथ केंगले पोलिस पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुती दादा केंगले बाळु केंगले,अशोक पेकारी राजु घोडे,मुख्याध्यापक श्री.के.जी.केंगले सर,मा.उपसरपंच विलास केंगले, तंटामुक्ती अध्यक्ष, नामदेव भोकटे, किसन शेळके,किसन पारधी,अंकुश गिरंगे,भिमा केंगले, दुंदा किरवे,दत्ता गिरंगे,सागर काठे प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मारुती पारधी,सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किरण भवारी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.शिवराम केंगले यांनी मानले.