.
नारायणगाव : (प्रतिनिधी) अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी बंडलबाज वधू व तिला साथ देणाऱ्या टोळीला नारायणगाव पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. नारायणगाव पोलीस ठाण्यात शरद तुकाराम गायकवाड (रा. खोडद तालुका जुन्नर जिल्हा पुणे )यांनी त्यांची लग्नाचे खोटे नाटक करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रारीवरून नारायणगाव पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर १६०/२०२५ भारतीय न्यायसंहिता 318(4), 316(2), 3(5) प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी १)सुवर्णमाला सुरेश वाडकर (रा. छत्रपती संभाजी नगर, ) २) मनीषा अडसुळे (रा. सिंहगड रोड पुणे) 3) संतोष सखाराम घोडे (रा. पिंपळनेर पावर हाऊ जवळ जालना रोड, ता. देऊळगाव जि. बुलढाणा) 4)भारती दामोदर मोरे (रा. डोणगाव इंदिरानगर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ) 5) अश्विनी सागर जगदाळे (रा. 165/ पी पर्वती दर्शन स्वारगेट पुणे,) 6) सुनील काळे (रा. पंचतळे, शिरूर ) 7) पंकज डग (रा. पंचतळे, शिरूर ) 8) नामदेव कोल्हे( रा, जांबुत, ता. पारनेर जि. छत्रपती संभाजी नगर) या बाबत अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार म्हणाले की,आरोपींना त्यांचे बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन तपास करून ताब्यात घेऊन नारायणगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता यातील आरोपींनी अशाच प्रकारे गुन्हा करून अनेक युवकांना आर्थिक दृष्ट्या फसवले असल्याची माहिती मिळाली. या गुन्ह्यातील काही आरोपींनी मध्यस्थी करून लग्न लावून दिले म्हणून ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील एक महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे कडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील वधू महिला अश्विनी सागर जगदाळे हिचा कसून तपास केला असता केला असता तिला 16 वर्षाची एक मुलगी असून 14 वर्षाचा एक मुलगा आहे तसेच या महिलेने अशाप्रकारे 6,7 तरुणांना लग्न करून फसवले असल्याचे तपासात आढळून झाले आहे. यातील चार आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असून तीन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करणे बाकी असून आरोपींनी जुन्नर, पारनेर, शिरूर इत्यादी ठिकाणी देखील याच प्रकारचे गुन्हे केले असल्याची माहितीया गुन्ह्याचे तपासात मिळून आली आहे. या गुन्ह्यात एकूण 25000 रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील करीत आहे.