कुकडी प्रकल्पाच्या धरणात पाण्याच्या साठा वाढला.. वडज व येडगाव धरणातून नदीच्या पात्रात पाणी सोडले.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी) कुकडी प्रकल्पाच्या अंतर्गत येत असलेल्या धरणांमध्ये पाण्याचा साठा झपाट्याने वाढत असून मंगळवार (दि. 8) अखेर 46.38% इतका पाणीसाठा वाढला आहे. दरम्यान मागील वर्षी कुकडी प्रकल्पामध्ये आजच्या तारखेला अवघे 7.81% इतकेच पाणी शिल्लक होते. जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणामध्ये 90% पाण्याचा साठा झाला असून माणिकडोह धरण 23.10% भरले आहे. तसेच वडज धरणात 69.79 टक्के पाण्याचा साठा वाढला आहे. या धरणाच्या पश्चिमेला पाऊस अधिक पडत असल्याने मी नदीच्या पात्रात दोन दिवसापासून पाणी सोडले जात आहे. पिंपळगाव जोगा धरण 19.04 टक्के भरले आहे. डिंभे धरणातही पाण्याचा साठा वाढला असून 64.71 टक्के इतका पाण्याचा साठा झाला आहे . चिल्हेवाडी धरण देखील 78.78% इतके भरले आहे. दरम्यान येडगाव धरणामध्ये पाण्याचा साठा वाढल्याने कुकडी नदीच्या पात्रात 1500 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले असून धरणाच्या डाव्या कालव्यातून 1200 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले आहे. हे पाणी पारनेर, कर्जत, करमाळा श्रीगोंदा इथपर्यंत जाणार आहे. सध्या धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यामुळे गरज पडल्यास कुकडी नदीच्या पात्रात व कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग अधिकचा वाढविण्यात येणार आहे. दरम्यान वडज धरणातून मीना नदीच्या पात्रात 1000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. मीना नदीच्या पात्रात व कुकडी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्याने या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणीही उतरू नये तसेच नदीच्या कडेला असलेले कृषी पंप काढून घ्यावेत. आणि आपले पाळीव जनावरे नदीच्या प्रवाहाकडे नेऊ नयेत असे आवाहन कुकडी प्रकल्पाचे नारायणगाव कार्यालयाचे उपविभागीय अभियंता रवींद्र हांडे यांनी केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!