नारायणगाव महाविद्यालयात 10 जुलै रोजी इंटर्नशिप एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) अंतर्गत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकाराने ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव ता. जुन्नर येथे विद्यार्थ्यांमध्ये कार्यानुभव व ऑन-जॉब ट्रेनिंगबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे.

या उपक्रमात स्थानिक उद्योग, एमआयडीसी, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी व संघटनांचा सहभाग असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगजगताचा अनुभव, कौशल्य विकास व रोजगारक्षमतेचे महत्व समजावून सांगण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी जोडणारा उपक्रम असून ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील संधी समजून घेण्यास, आवश्यक कौशल्यांची तयारी करण्यास आणि त्यांच्या करिअरसाठी योग्य दिशा मिळवण्यास मदत करणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव व जुन्नर या तीन तालुक्यातील निवडक उद्योजक सहभागी होणार असून कार्यशाळेसाठी सहभागी होणाऱ्या उद्योजक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे उद्घाटन उत्तर पुणे जिल्ह्यातील हॉटेल परिवार उद्योग समूहाचे संस्थापक श्री संदीप नाईक यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष कृषिरत्न श्री अनिल मेहर हे असणार आहेत. या कार्यशाळेत मुख्य दोन सत्र होणार असून त्यासाठी वेब सोल्युशन प्रा.लिमिटेड चे श्री वैभव पोखरकर व मनाली कलेक्शन चे संस्थापक शामराव थोरात आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील के मार्ट सुपर मार्केट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवीण शेळके हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेमध्ये परिसरातील जास्तीत जास्त उद्योजक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आव्हान कार्यशाळा समन्वयक डॉक्टर उत्तम पठारे व प्लेसमेंट सेलचे विभाग प्रमुख प्रा दिनेश गाजुलवार यांनी केले आहे . कार्यशाळेसाठी संपर्क साधण्यासाठी प्रो. डॉ. शिवाजी टाकळकर, डॉ. शरद कापले, डॉ. रसूल जमादार, प्रा.सुभाष कुडेकर, प्रा.आकाश कांबळे,डॉ. श्रीकांत फुलसुंदर व प्रा. शंतनू ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा.

जाहिरात

error: Content is protected !!