जयहिंदच्या बालचमुचा चैतन्यमय सोहळा..
नारायणगाव : ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राची संतपरंपरा म्हणजे आषाढी वारी…ज्ञानबा तुकाराम या चैतन्यमय मंत्राची अनुभूती दिंडीत गेल्याशिवाय येत नाही, जयहिंदच्या बालचमुनीं असाच चैतन्यमय सोहळा साजरा करून विठूनामाचा जयघोष केला. विद्यार्थ्यांनी विविध अभंग सादर केले, फेर, फुगडी प्रकार सादर केले. ‘सदर उपक्रम शालेय जीवनात उपयुक्त असून विद्यार्थ्यांना कृतीशील बनवतात, विद्यार्थ्यांना परंपराची माहिती होते. निष्ठा, ऐक्य अशा विविध मूल्यांची रुजवणूक होते या उपक्रमातून होत असून, असे विविध उपक्रम जयहिंद संकुलात राबविले जातात अशी माहिती प्रा डॉ किरण पैठणकर यांनी दिली.आषाढी दिंडीसाठी जयहिंद संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, उद्योजक संदिप मुथथा संचालिका अंजली गुंजाळ, इंदुमती गुंजाळ, शुभांगी गुंजाळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दत्तात्रय गल्हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनिल वाघमारे व रजनी पाठक यांनी केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियोजन पाहिले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिंडीची सांगता झाली.