नारायणगाव : (प्रतिनिधी ) दि. 4/07/2025 रोजी जि. प. प्राथ. शाळा- (वैशाखखेडे ता. जुन्नर, जि. पुणे) येथे बालवारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.टाळ- मृदूंग, चिपळ्या, यांच्या तालात संतांच्या अभंगवाणीने वातावरण भारावून गेले होते.त्यात अनेक बालचमुंनी विविध संतांच्या वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, भगवान पांडुरंग, माता रुख्मिणी अशा वेशभूषा करून तसेच अनेक वारकरी पेहरावात सहभागी झाले.
आपली भारतीय संस्कृती,वारीची उज्ज्वल परंपरा जपण्याचे काम यासारख्या उपक्रमातून जिल्हा परिषदेच्या शाळांकडून निश्चित केले जाते.
आपल्याला पंढरपूरला वारीला जरी जाता आले नाही तरी शाळेच्या बालवारकऱ्यांच्या दिंडीच्या रुपाने पंढरीचा पांडुरंगच आपल्या दारात उभे ठाकल्याचा प्रत्यय आल्याचे उपस्थित सर्व भाविकांनी नमूद केले.
दिंडीला भेट देण्यासाठी विघ्नहर टाइम्सचे प्रॉप्रायटर श्री सुरेश वाणी साहेब उपस्थित होते. त्यांनी बाल वारकऱ्यांना खाऊसाठी 501/-रू योगदान दिले.श्री ज्ञानेश्वर माऊली कुसाळकर व श्री अरुण शेटे यांनीही सर्व विद्यार्थी व पालकांना लाडूच्या प्रसादाचे वाटप केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री योगीराज अनंत सर, श्रीम. प्रज्ञा खिलारी मॅडम, श्रीम. भागवत मॅडम, सौ. शेटे मॅडम, सर्व पालक, ग्रामस्थ तसेच शाळा व्यव. समिती सदस्यांचे योगदान लाभले.