नारायणगाव : (प्रतिनिधी)
रोटरी क्लब प्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी व महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या इनरव्हिल क्लब या सामाजिक संस्थेचा पदग्रहण कार्यक्रम सोहळा नुकताच नारायणगाव येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील इंटरनॅशनल लेव्हलच्या पीआयआयडब्लूआय चारुलता चिंचणकर होत्या.
आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन हॅपी स्कूल ची संकल्पना राबवत नारायणगाव क्लबने उच्चांक गाठला याचे कौतुक श्रीमती चिंचणकर यांनी यावेळी केले.
क्लब च्या वतीने ज्ञानदा शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले . क्लबच्या वतीने संपूर्ण वर्षभरात सामाजिक स्तरावर कोण कोणती कामे करण्यात येणार आहेत याचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात आला.
या कार्यकारिणीत खजिनदार ज्योती सोमवंशी, आयएसओ अंजली खैरे, संपादक रुचिता वाघ, यांची निवड करण्यात आली.तर पास्ट प्रेसिडेंट सविता खैरे, प्रीती शहा, रश्मी थोरवे, नंदा मुथ्था, डॉ.नंदिनी घाडगे,रुपाली शहाणे, वर्षा तांबे, सुनिता कोल्हे, स्वाती मुदगल, ममता तंवर, स्मिता वाजगे,सुषमा वाजगे, माधुरी चौधरी,प्रिया वाघमारे, संजिवनी वाबळे,प्रगती नवले आदी इनव्हिलचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तविक प्रीती शहा यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली खैरे यांनी केले तर आभार रश्मी थोरवे यांनी मानले.