“जयहिंद” वर योगा शिबिर संपन्न.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जयहिंद शैक्षणिक संकुल आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योग आणि प्राणायाम याचे महत्त्व पटवून देत असतानाच शिक्षकांकडून योग आणि आसने योग गुरु प्रा. बाळासाहेब ढमाले यांनी करून घेतली.योग दिन साजरा करण्यामागे योग आणि प्राणायाम यांचे सुंदर आणि नैसर्गिक उपयोग सर्वसामान्य लोकांना माहीत व्हावे तसेच जागतिकीकरणामुळे आरोग्या समोर निर्माण झालेले आव्हान कमी करणे हा हेतू असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब ढमाले यांनी केले. योगामुळे ज्ञान व आरोग्य चांगले राहत असून सर्वच वयोगटातील व्यक्तींना योगसाधनेची गरज आहे. योगासनांच्या माध्यमातून प्रत्येकाने आपले मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राखले तर आजकालच्या अनेक विकारांवर योगासने प्रभावी आहेत तसेच मनावर नियंत्रण करून मानव सुखी होतो वा निरोगी राहतो. म्हणून सर्वच व्यक्तीने योगा करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्ले, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, सुभाष आंद्रे, स्वप्निल पोखरकर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचे आयोजन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. आर ए गाडेकर आणि पटाईत एस. बी. यांनी तर छायांकन आणि चित्रफित प्रा. सागर रसाळ यांनी केले.

जाहिरात

error: Content is protected !!