नारायणगाव : ( प्रतिनिधी ) वडगाव सहाणी येथील जयहिंद कॉम्प्रिहेन्सिव्ह एजुकेशन इंस्टिट्यूट संचलित जयहिंद कॉलेज औषध निर्माणशास्त्र (डी.फार्मसी) अभासक्रमाच्या महाराष्ट्र तंत्रशिक्षणमंडळाने उन्हाळी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले.
प्रथम वर्ष डी.फार्मसी ९०.५७%निकाल लागला असून, कु. ताजणे स्नेहल,७२.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, कु. नाईकोडी सुशांत ७१.०० %, गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. शिंगोटे श्रद्धा ७०.३०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला,
द्वितीय वर्ष डी फार्मसी चा निकाल ८९.६०% लागला असून , द्वितीय वर्षामध्ये कु. फडाळे ज्ञानेश्वरी ७९.७३% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, कु. प्रसाद प्रिया ७६.४६%, गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच कु. वाव्हळ संस्कृती ७३.०९% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एस.गल्हे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.