महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी 2025 परीक्षेत जयहिंद पॉलीटेक्निक निकाल 92%.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी 2025 परीक्षेमध्ये जयहिंद पॉलीटेक्निक कुरणचा निकाल 92% लागल्याची माहिती प्राचार्य डॉक्टर स्वप्निल पोखरकर यांनी दिली. प्रथम वर्ष निकालामध्ये संगणक विभागातील विद्यार्थी कु. सार्थक नितीन दांगट याने 91.18% गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला. द्वितीय क्रमांक माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थिनी कु. आर्या अर्जुन मानकर हिने 90% मिळवून संपादन केला. तृतीय क्रमांक संगणक विभागातील विद्यार्थी कु.गिदे साईल सुभाष याने 89.29 % गुण संपादन करून मिळविला.तसेच द्वितीय वर्षांमध्ये संगणक विभागातील विद्यार्थिनी कु. श्रेया संदीप शेटे हिने 93.29% गुणांसह प्रथम क्रमांक संपादन केला. द्वितीय क्रमांक संगणक विभागातील विद्यार्थीनी कु. अवंती अविनाश शेलार हिने 92.71% गुण संपादन करून मिळविला व तृतीय क्रमांक माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी कु. साई राजाराम गावडे याने 92.59% गुण संपादन करून मिळविला. त्याचप्रमाणे तृतीय वर्षामध्ये संगणक विभागातील विद्यार्थिनी कु. संस्कृती सुनिल दळवी हिने 96.34% गुणांसह प्रथम क्रमांक संपादन केला. द्वितीय क्रमांक संगणक विभागातील विद्यार्थी कु. यशराज दिनेश हांडे याने 95.83 % गुण मिळवून संपादन केला. तसेच तृतीय क्रमांक संगणक विभागातीलच विद्यार्थिनी कु.साक्षी माणिक हांडे हिने 95.54 % गुण संपादन करून मिळविला. महाविद्यालयामध्ये सर्व विभागामध्ये प्रथम येण्याचा बहुमान कु.संस्कृती सुनिल दळवी हिने पटकावला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दत्तात्रय गल्हे तसेच पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. स्वप्नील पोखरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

error: Content is protected !!