स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक स्वबळावर लढा. कार्यकर्त्यांचा आग्रह.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) माजी आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आज (दि. 5) बैठक पार पडली या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढ्यात असून राज्यात जरी आपण महायुती सोबत असलो तरी नगरपरिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र लढवावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या मागणीच्या पक्षश्रेष्ठींनी विचार करावा असे माजी आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांना सांगितले. यावेळी बोलताना प्रदीप कराडकर म्हणाले की, राज्यामध्ये आपले महायुतीचे सरकार आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय देत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वतंत्र लढवायच्या याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील. तथापि तुमच्या भावना मी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना सांगतो. पक्ष संघटना मजबूत करा महायुती सरकारचे निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा असे आवाहन यावेळी गारटकर यांनी कार्यकर्त्यांना केले. दरम्यान यावेळी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला, तसेच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणनीती संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. राज्यात आपण महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलो तरी पक्ष संघटना वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्यास याचा पक्ष वाढीला फायदा होईल असा सूर बहुतांशी कार्यकर्त्यांचा होता. या बैठकीला पक्षाचे जिल्हाअध्यक्ष. प्रदीप गारटकर, सुहास गरुड, पायलताई देवकर, आण्णा महाडिक, जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार,आणि पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पक्षाचा वर्धापन दिन दहा तारखेला पुणे या ठिकाणी होणार असून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले.

जाहिरात

error: Content is protected !!