“विघ्नहर” चे 2025 -26 लागवड हंगाम धोरण जाहीर.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी) विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने लागवड हंगाम हंगाम 2026-27 साठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्याकरीता लागवड हंगाम सन 2025-26 मध्ये ऊस लागवडीचे धोरण 1 जून पासुन सुरु करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. ऊस लागवड धोरणाबाबत शेरकर म्हणाले की, आडसाली ऊस लागवडीसाठी 1 जुन ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये को. 86032, को. एम. 0265, पीडीएन. 15012, कोव्हिएसआय-18121, पीडीएन. 11082, पीडीएन. 15006 व पीडीएन. 13007 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देणेत आली आहे. तसेच पुर्वहंगामी लागवडीसाठी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून त्यामध्ये को.86032, को.एम.0265, पीडीएन. 15012, कोव्हिएसआय-18121, पीडीएन. 11082, पीडीएन. 15006, पीडीएन. 13007, को-9057 व व्हीएसआय-08005 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देणेत आली आहे. तसेच सुरु हंगामासाठी 1 डिसेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत को. 86032, को.एम.0265, पीडीएन. 15012, कोव्हिएसआय-18121, पीडीएन. 11082, पीडीएन. 15006, पीडीएन. 13007, को-9057 व व्हीएसआय-08005 या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देणेत आली आहे. त्यातील डिंसेंबर महिन्यात कोएम-0265 या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार कारखाना कार्यक्षेत्रामध्ये सर्व सभासद व ऊस उत्पादकांना 1 जुन 2025 पासुन वरील प्रमाणे उपलब्धतेनुसार वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात करण्यात आले आहे. दरम्यान कारखाना कार्यक्षेत्रात गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध व्हावा म्हणून कारखान्यामार्फत ऊस विकास अभियान प्रमाणावर राबविले जात असून त्या अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागणीनुसार उधारी तत्वावर ऊस बेणे व ऊस रोपांचा पुरवठा केला जातो. ऊस लागवड व कारखान्याकडे नोंद झालेनंतर प्रति एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी प्रत्यक्ष बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होवुन रासायनिक खतांची मात्रा कमी होणेसाठी जीवाणू खतांचा पुरवठा केला जातो. जमिनीची सुपिकता वाढविणेसाठी हिरवळीचे खतासाठी ताग बियाणेचा पुरवठा केला जातो. पाण्याची व रासायनिक खतांची बचत करुन अधिकचे उत्पादन घेणेसाठी कारखान्यामार्फत ठिबक सिंचन योजना राबविणेत येत असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!