निवृत्तीशेठ शेरकर हे समाजाचे दिपस्तंभ -डॉ. गिरीश ओक

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी ) समाजाची सेवा करत असताना स्व. निवृत्तीशेठ शेरकर आणि स्व. हिराबाई शेरकर यांनी तालुक्यातील लोकांसाठी प्रामाणिक काम करुन शुन्यातून विश्वनिर्माण केले. स्व.निवृत्तीशेठ शेरकर यांनी स्थापन केलेल्या विघ्नहर सहकारी कारखान्याचा कारभार कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर हे पारदर्शकपणे सांभाळत असून स्व. निवृत्तीशेठ शेरकर हे दिपस्तंभ असून त्यांनी समाजाला दिशा दाखवली व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सत्यशील शेरकर व त्यांचे संचालक मंडळ चालत असल्याचे सिने अभिनेते डॉक्टर गिरीश ओक यांनी सांगितले. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांचे १८ वे व त्यांच्या पत्नी स्व. हिराबाई शेरकर यांच्या १६ वे पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, सर्व संचालक मंडळ नंदू शेरकर, कार्यकारी संचालक भास्कर घुले, माजी आमदार श्री. बाळासाहेब दांगट, आशाताई बुचके, सुमित्राताई शेरकर, योगिताताई शेरकर, राजश्रीताई बोरकर, शरदराव लेंडे, बबनराव थोरात, तान्हाजी बेनके, ह.भ.प. गंगाराम डुंबरे, अंकुश आमले, गणेश कवडे, समिर शेरकर, अभिजीत शेरकर, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आदी मान्यवरांसह श्रीविघ्नहर कारखान्याचे सर्व माजी संचालक, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, शिरोली पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विविध गांवांचे सरपंच, उपसरपंच, अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि सत्यशिल शेरकर यांचा मित्र परिवार तसेच कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शेरकर कुटूंबीयांच्या वतीने करण्यात आला. प्रास्ताविक करताना चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले की, स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांची स्मृती कायम स्मरणात रहावी या उद्देशाने दरवर्षी पुण्यस्मरण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सत्यशील शेरकर यांनी उपस्थित सर्वच मान्यवर व ऊस उत्पादक शेतकरी स्वागत केले. यावेळी बोलताना सत्यशिल शेरकर म्हणाले की, स्व. निवृत्तीशेठ शेरकर यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार विघ्नहरचा कारभार पारदर्शकपणे केला जात असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. तसेच विघ्नहरला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम सर्व संचालक मंडळांच्या सहकार्याने केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले कि, या वर्षी कारखान्याचे विस्तारीकरण केले असून पुढील गळीत हंगामात ऊस तोडणी वेळेत होईल तसेच या वर्षी एफ.आर.पी. पेक्षा जास्त ऊस दर देणार आहोत. त्याच तसेच दुसरे पेमेंट जून महिना अखेरीस अदा करणार असून दिवाळीही ऊस उत्पादकांची गोड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले असून सभासद व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. दरम्यान याप्रसंगी शरदराव लेंंडे, बबनराव थोरात, आशाताई बुचके, तान्हाजी बेनके, हभप गंगारामबुवा डुंबरे आर्दीनी स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहीली. प्रारंभी उपस्थित डॉ. गिरीश ओक यांचे हस्ते स्व. निवृत्तीशेठ शेरकर व स्व. हिराबाई शेरकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. उपस्थितांचे आभार कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी मानले.

जाहिरात

error: Content is protected !!