बहिणींचे पंधराशे रुपये बंद होणार नाहीत.. आम्ही देणारेआहोत.. घेणारे नाहीत- अजित पवार

WhatsApp

लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणारच. आम्ही देणारे आहोत घेणारे नाही -अजित पवार

नारायणगाव पुढारी वृत्तसेवा लाडक्या बहिणींना नाराज करणार नसून त्यांच्यामुळेच आम्ही निवडुन आलोय त्यामुळे त्यांच्या खात्यावर दर महिन्याला मिळत असलेले पंधराशे रूपये बंद होणार नाही. आम्ही देणारे आहोत घेणारे नाहीत, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरी बुद्रुक या ठिकाणी दिले बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) या ठिकाणी ३३/११ के.व्हि. सबस्टेशन भूमीपुजन सोहळा व स्मार्ट व्हिलेज पर्यटनग्राम शेतजमीन मोजणी प्रकल्पातील क पत्रकाचे वाटप प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी माजी मंत्री व आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार अतुल बेनके,जिल्हाधिकारी जितेंद्र हुड्डी, डॉ .सुहास दिवसे, मुख्य अधिकारी गजानन पाटील, महावितरणचे प्रादेशीक संचालक भुजंग खंदारे, सुधीर काकडे,युवराज जरग, शांताराम बांगर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.संजय काळे, उपसभापती प्रितम काळे,विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर,माजी जि.प.सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे,आशा बुचके, गणपतराव फुलवडे, अनंतराव चौगुले,प्रकाश जाधव,वल्लभ शेळके,भास्कर गाडगे,प्रियंका शेळके, गावच्या सरपंच वनिता डेरे,माजी सरपंच पुष्पा कोरडे,दिनेश जाधव,मोजणी समीतीचे अध्यक्ष रंजन जाधव,ॲड.संजय टेंबे,पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अमोल कोरडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे,गणेश औटी, सतीश जाधव,सुनिल जाधव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की बोरी बुद्रुक या ठिकाणी होत असलेल्या सबस्टेशन चा फायदा या परीरातील गावांना होणार आहे तसेच पुणे जिल्ह्याच्या पर्यटन आराखडा तयार केला असुन या मध्ये विशेष करून जुन्नर तालुका हा राज्यात पर्यटन तालुका जाहीर झाला असुन भविष्यात पर्यटनाच्या मार्फत युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.तसेच या गावाची मोजणी करण्यात आली त्यामुळे लोकांमधील वाद कमी होणार आहे व जमीनीच्या कागदपत्राच्या अचुकतेमुळे भविष्यातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत मिळणार आहे व गावाच्या विकासासाठी जी काही मदत लागेल शासन म्हणुन आम्ही आपल्या पाठीशी आहे असे सांगितले. ८२ टक्के मोजणी पुर्ण झाली असुन यामध्ये १ हजार ७७७ घटकांपैकी १हजार ४६४ गटांची मोजणी पुर्ण झाली आहे तर ३१३ गटांच्या मोजणीचे काम प्रगतीपथावर आहे या क पत्रकाचे वाटप करण्यात आले.

जाहिरात

error: Content is protected !!