वीज अंगावर पडून दोन युवक जखमी. एकाची प्रकृती गंभीर.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी) नारायणगाव येथे पुणे नाशिक महामार्गाजवळ वीज कोसळल्याने दोन तरुण जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (दि. 19 ) दुपारी येथील पुणे नाशिक महामार्गावर घडली. वीज कोसळल्याने मध्य प्रदेश येथील सोनू कोल (वय 22), अमन राजमान कोल (वय 18, सध्या दोघेही राहणार 14 नंबर) हे दोन बांधकाम मजूर भाजल्याने जखमी झाले. यापैकी सोनू कोल हा भाजल्याने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. मध्यप्रदेश येथून रोजगारासाठी आलेले हे तरुण 14 नंबर येथे सध्या वास्तव्यास आहेत. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथून 14 नंबर येथे घरी जात असताना विजेचा मोठा आवाज झाला.सोनू कोल याच्या गळ्यात धातूची चैन होती. यामुळे विजेचा प्रवाह उतरून गळ्याभोवती भाजल्याने सोनू हा गंभीर जखमी झाला त्या नंतर तो बेशुद्ध पडला.त्याचा गळा, दोन्ही पाय व पोटाच्या भागावर भाजल्याच्या खुणा आहेत. अमन कोल किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान येथील नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून उपसरपंच योगेश पाटे यांनी त्यांना उपचारासाठी येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!