नारायणगाव : (प्रतिनिधी ) नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुणे नाशिक महामार्गावर मांजरवाडी रोडला पुलाखाली गांजा विक्री करणाऱ्या इसमाला मुद्देमालासह पकडून त्याच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा गांजा सह मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवैधरीत्या चालू असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहीम चालू करून अमली पदार्थ विकणाऱ्यांवर तसेच जवळ बाळगणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिल्याने या सूचनांच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर रवींद्र चौधर स्थानिक गुन्हे अन्वेषण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांनी पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, पोलीस शिपाई सत्यम केळकर, पोलीस शिपाई सुभाष थोरात, पोलीस शिपाई गोरक्ष केंद्रे, पोलीस पाटील जाधव, महिला पोलीस शिपाई शितल गारगोटे , पोलीस हवलदार संतोष कोकणे , वनपरिक्षेत्राधिकारी श्री प्रदीप चव्हाण, शासकीय पंच यांचे पथक तयार करून गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 16 मे 2025 रोजी 00.05 ते 01.00 वाजताचे दरम्यान संशयित इसम नामे आकाश मारुती शिंदे( वय 25 वर्ष रा. हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या राहणार नारायणगाव, ता.जुन्नर जि.पुणे )यास मौजे वारूळवाडी, ता. जुन्नर जि. पुणे या गावाचा हद्दीत पुणे नाशिक हायवेच्या मांजरवाडी पुलाखाली रंगेहात पकडले असून त्याच्याकडून
1) 4.8 किलोग्रॅम वजनाचा गांजा.2) एक केसरी रंगाचा 40 किलो वजन क्षमतेचा वजनकाटा 3) एक काळ्या रंगाची स्कॉडा कंपनीची फॅबीया या मॉडेलची चारचाकी गाडी (नं.एम. एच. 04, ई. टी. 4626 )असा एकूण 5,49,000/- रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी आकाश मारुती शिंदे याचे विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम,1985 कलम 8(c),20(b)(ii)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील हे करीत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
दरम्यान ही कारवाई नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, पोलीस शिपाई सत्यम केळकर, पोलीस शिपाई सुभाष थोरात, पोलीस शिपाई गोरक्ष केंद्रे, पोलीस पाटील जाधव, महिला पोलीस शिपाई शितल गारगोटे , पोलीस हवलदार संतोष कोकणे, वनपरिक्षेत्राधिकारी श्री प्रदीप चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे, संदीप वारे व पोलीस शिपाई अक्षय नवले यांचे पथकाने केले आहे.