कुकडी प्रकल्पातून अधिकचे पाणी नगर जिल्ह्यासाठी सोडल्यास माझा विरोध – अतुल बेनके

WhatsApp


नारायणगाव :(प्रतिनिधी) जुन्नरचे लोकप्रतिनिधी शरद सोनवणे यांचं कुकडी प्रकल्पातील पाणी वितरणाकडे लक्ष नसल्यामुळे या प्रकल्पामध्ये अधिकचे पाणी पूर्व भागातील तालुक्यासाठी नेण्याचा घाट घातला जात आहे, मात्र मी तसे होऊ देणार नाही. कुकडी प्रकल्पातील अधिकच पाणी कदापिही मी तिकडे जाऊ देणार नाही असा इशारा जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी दिला आहे. यासंदर्भात बेनके शुक्रवारी (ता 16) जलसंपदा विभागाच्या नारायणगाव कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर यांना शेतकऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देणार आहेत. याबाबत बोलताना बेनके म्हणाले की, यंदा कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा पुरेपूर होता. परंतु जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचे याकडे लक्ष नसल्यामुळे पूर्व भागातील तालुक्यांसाठी जास्तच पाणी नेलेले आहे. तसेच 16 मे पासून कर्जत,करमाळा,जामखेड पारनेर या तालुक्यांसाठी येडगाव कालव्यातून २५ दिवसांसाठी पाणी अधिकचे सोडले जणार आहे. जर कुकडी प्रकल्पातून अधिकचे पाणी पूर्व भागातील तालुक्यांसाठी गेले तर जुन्नर तालुक्यामधील जनतेला पिण्यासाठी पाणी शिल्लकच राहणार नाही. सध्या कुकडी प्रकल्पामध्ये अवघे 8 टक्के पाणी आहे. पूर्व भागातील तालुक्यासाठी कुकडी प्रकल्पाच्या मृतसाठ्यांमधून अधिकचे पाणी देण्याचा घाट घातला जात आहे. दुर्दैवाने जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे याकडे लक्ष नाही. जुन्नर तालुक्यात सुद्धा पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार असल्याने मी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे बेनके यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिरिक्तचे पाणी मी पूर्व भागातील तालुक्यांसाठी जाऊ देणार नाही आणि तसा जर जास्त पाणी नेण्याचा प्रयत्न झाला तर मग मात्र शेतकऱ्यांसोबत मला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी आमदार बेनके यांनी दिला आहे.

जाहिरात

error: Content is protected !!