वारुळवाडीचे जेष्ठ नागरिक खंडू संते डिंभे डावा कालव्यात बेपत्ता? रेस्क्यू टीमकडून शोधाशोध सुरू.

WhatsApp


नारायणगाव : (प्रतिनिधी ) जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथील खंडू श्रीपत संते (वय 62) या जेष्ठ नागरिकाने आज (दि. 14) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास येथील डिंभे डावा कालव्यातील पाण्यात उडी मारली असल्याची माहिती मिळत असून.पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून गेले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नारायणगाव पोलीस व जुन्नर येथील रेस्क्यू टीमचे अकरा सदस्य, नारायणगाव येथील पोलीस व ग्रामस्थ खंडू संते यांचा दुपारी बारा वाजल्यापासून कालवा परिसरात शोध घेत आहेत. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत ते आढळून आले नाहीत. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी येथील ठाकरवाडी रस्त्यालगत असलेल्या डिंभे डावा कालव्यात उडी मारली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.कालव्यात डिंभे धरणातून 500 कुसेक्सने उन्हाळी आवर्तन सुरू आहे. पाण्याला जास्त वेग असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहून गेले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे . याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,पोलीस हवलदार मंगेश लोखंडे ,पो.काँ.केळकर,डोके,बनकर पोलीस पाटील सुशांत भुजबळ, माजी सरपंच राजेंद्र मेहेर, आत्माराम संते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कालवा परिसरात प्राथमिक तपास केला. दुपारी एक नंतर जुन्नर रेसक्यू टीमचे रुपेश जगताप,राजकुमार चव्हाण,आतिफ सय्यद,अली सय्यद,संदीप पारधी,आदित्य आचार्य,मगदूम सय्यद,आदित्य चव्हाण,पिंटू करपे, दिनेश पापडे हे घटनास्थळी दाखल झाले.आर्वी येथून डिंभे डावा कालव्यातील पाणी मीना नदी पात्रात वळवून पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला. रेस्क्यू टीमने कालव्यात सुमारे दोन किलोमीटर परिसरात शोध घेतला मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत ते मिळून आले नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व हवलदार मंगेश लोखंडे यांनी सांगीतले.

जाहिरात

error: Content is protected !!