नारायणगाव : (प्रतिनिधी) ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिराचा दहावी बोर्डाचा निकाल 98.90% लागला असून हा निकाल आतापर्यंतचा उच्चांक निकाल असल्याचे मुख्याध्यापिका सुषमा वाळींबे यांनी सांगितले. विद्यामंदिरातील एकूण 365 विद्यार्थ्यांपैकी 361 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.गौरवशाली निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे,कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर,उपाध्यक्ष शशिकांत वाजगे,कार्यवाह रवींद्र पारगावकर व सर्व संचालक मंडळांनी विद्यार्थी पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. विद्यामंदिरातील प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक – उचगावकर अनुश्री आशिष 99.20% द्वितीय क्रमांक – थोरात स्वरांगी संदीप – 97% तृतीय क्रमांक – ओव्हाळ समीक्षा पोपट-96.80% चतुर्थ क्रमांक – भालचिम स्नेहल शंकर – 96.60% पाचवा क्रमांक – 5 मेहेर वेदिका दिनेश – 95.60% विद्यामंदिरातील 19 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. दरम्यान सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्याध्यापिका सुषमा वाळिंबे,पर्यवेक्षक विलास शिंदे,अनुपमा पाटे,मानसी भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला.