जुन्नर तालुक्यात आज सतरा ठिकाणी होणार वन्य प्राण्यांची गणना.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी)
बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून जुन्नर तालुक्याच्या वनक्षेत्रामध्ये वन्य प्राण्यांची गणना आज (दि. 12) सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.
या विषयी अधिक माहिती देताना जुन्नरचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण म्हणाले की, जुन्नर तालुक्यामध्ये 17 ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना केली जाणार आहे. यासाठी 34 कर्मचारी नियुक्त करण्यात आली असून उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवले जात आहे. तसेच सहाय्यक वन संरक्षक स्मिता राजहंस व अमृत शिंदे यांचे या अभियानासाठी मार्गदर्शन असणार आहे.
वन्य प्राणी रात्रीच्या वेळेला पानवट्यावर येत असतात. यामध्ये माकड, तरस, ससा, मुंगुस, हरीण, कोल्हा, बिबट्या आदींचा समावेश असू शकतो. वन्य प्राण्यांचा सर्वे करत असताना पाणवट्यावर आलेल्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारची चाहूल न लागता वनविभागाचे कर्मचारी हा सर्व्हे करणार आहेत.
दरम्यान वन विभागाचे कर्मचारी सुरक्षितस्थळी थांबून अथवा काही ठिकाणी मचाण उभी करून त्या ठिकाणाहून या वन्य प्राण्यांचा सर्वे केला जाणार असल्याचे ओतूरचे वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी सांगितले.

जाहिरात

error: Content is protected !!