बंधारे पडले कोरडे.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी )
मीना नदीवर असलेल्या पिंपळगाव कोल्हापूर बंधाऱ्यामध्ये अद्याप पाणी न आल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावराच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. तसेच या पाण्यावर अवलंबून असलेली पिके देखील करपू लागली आहेत. दोन्ही बंधारे कोरडे पडल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कुचुंबना होत आहे. जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी या बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केलेली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते जयेश खांडगे यांनीही मागणी केलेली आहे. या पाण्यावर उसाच्या पिकाबरोबरच इतरही तरकारी पिके अवलंबून आहेत. जलसंपदा विभागाने पिण्यासाठी या बंधाऱ्यात पाणी सोडावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.तातडीने या बांधाऱ्यामध्ये पिण्यासाठी पाणी सोडले नाही तर आंदोलन करावे लागेल असा इशारा शेतकरी वर्गाकडून देण्यात येत आहे.

जाहिरात

error: Content is protected !!