नारायणगाव ( प्रतिनिधी )
जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील जाधव वाडी या ठिकाणी चंदन लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करून आठ गोणी चंदनाचे तुकडे वजन काटा इतर साहित्य मोबाईल फोन चार चाकी गाडी असा एकूण 15950 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती ओतूर विभागाचे वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी दिली.
दरम्यान चंदनाची चोरी करणारा संशयित आरोपी लहू धुळे हा अंधाराचा फायदा घेऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. दरम्यान त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाची चार पथके रवाना करण्यात आल्याची माहिती ठोकळ यांनी दिली असून त्याला लवकरच अटक करू असे त्यांनी सांगितले.
सहाय्यक व संरक्षक अमृत शिंदे ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ वनपाल वनरक्षक वन विभागाचे कर्मचारी आळेफाटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान याबाबतचा पुढील तपास उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शकाखाली ओतूरचे वनक्षेत्रपाल लहू ठोकळ करीत आहेत.