जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरांची रेकी करून चोरी करणाऱ्या चोरट्याला LCB ने ठोकल्या बेड्या.


नारायणगाव : ( प्रतिनिधी )
जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखा पथकाने ठोकल्या बेड्या ठोकल्या असून चार मंदिरात चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली असून त्याच्याकडून एक किलो चांदी अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल व रोख रक्कम असा एकूण 1लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज ताब्यात घेतला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांनी दिली.
या प्रकरणी संतोष एकनाथ बर्डे (वय वर्ष 50 राहणार अकलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर )याला आळेफाटा परिसरात सापळा लावून अटक केली आहे. या चोरट्याने जुन्नर तालुक्यातील काळवाडी, येथील कालिका माता मंदिर,धोलवड भवनीनगर येथील अंबिका माता मंदिर, आंबेगाव तालुक्यातील लौकि येथील राणूबाई देवीचे मंदिर धामणी येथील काळुबाई मंदिरातून चांदी व सोन्याचे दागिने रोख रक्कम आधी ऐवजाची चोरी केली होती.
दरम्यान नागरिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिरात वारंवार चोरी होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांत पोलीसांच्या कार्यपद्धतीवर रोष वाढत चालला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून या चोरीचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुना शाखेला दिले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, अंमलदार दीपक साबळे, संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले,विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या चोरट्याचा शोध घेतला असता सर्व मंदिरात चोरी करणारा एकच आरोपी असल्याचे निदर्शनात आले.
दरम्यान आरोपीला सापळा लावून आळेफाटा येथे अटक करण्यात आली असून या आरोपीवर यापूर्वी नारायणगाव व घोडेगाव पोलीस ठाण्यात घरफोडी व मंदिर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.आरोपी हा मंदिर परिसरामध्ये मोल मजुरीचे काम करायचा व मंदिर परिसरात रेकी करून मंदिरात चोरी करायचा हे देखील पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

जाहिरात

error: Content is protected !!