पिंपळगावचा बंधारा कोरडा पडला. तात्काळ पाणी सोडा -सामाजिक कार्यकर्ते जयेश खांडगे यांची मागणी.

WhatsApp

मीना नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यात पाणी सोडा. शेतकरी वर्गाची मागणी.

नारायणगाव : ( प्रतिनिधी ) धरणाच्या खाली मीना नदीवर असलेले सर्व बंधारे कोरडे पडले असून या पाण्यावर अवलंबून असलेली पिके करपून गेली आहेत त्यामुळे जलसंपदा विभागाने या बंधाऱ्यांमध्ये वडज धरणातून पाणी तात्काळ सोडावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयेश खांडगे यांनी केली आहे.

वजज धरणाच्या खाली निमदरी बस्ती सावरगाव, वडगाव सहाणी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, सती कोण, आर्वी या ठिकाणी बंधारे असून हे सगळे बंधारे सध्या पाणी अभावी कोरडे पडले आहेत. या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यावर आजूबाजूच्या परिसरातील शेकडो एकर पिके अवलंबून आहेत. या परिसरामध्ये प्रामुख्याने ऊस केळी द्राक्ष तरकारी भाजीपाला आधी पिके घेतली जात आहेत परंतु कोल्हापूर पद्धतीचे या सगळ्या बाजारातले पाणी असल्यामुळे सगळी पिके करपू लागली आहेत. जलसंपदा विभागाने तातडीने या मंदिरात पाणी सोडावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग कडून होत आहे. याबाबतचे लेखी निवेदन जलसंपदा विभागाच्या नारायणगाव येथील कार्यालयाला यापूर्वीच देण्यात आले आहे. येथे दोन दिवसात जर या कालव्यामध्ये पाणी सोडले नाही तर सगळी पिके जळून खाक होतील अशी भीती सामाजिक कार्यकर्ते जयेश खंडगे यांनी व्यक्त केली असून तातडीने पाणी सोडावे अन्यथा शेतकरी वर्गाला आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

जाहिरात

error: Content is protected !!