बिबट्याच्या हल्ल्यात दहा शेळ्या ठार. शेतकऱ्याचे दोन लाखापेक्षा अधिकचे नुकसान.

WhatsApp

नारायणगाव : (प्रतिनिधी )

 जुन्नर तालुक्यातील काले येथील संतोष दत्तात्रय नायकोडी या शेतकऱ्याच्या बिबट्याने दहा शेळ्या ठार केल्या. ही घटना एक मे रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. तारेचे कंपाउंड वाकून बिबट्या आत मध्ये घुसला आणि दहा शेळ्या ठार केल्या असल्याची माहिती नायकोडी यांनी दिली. सात मोठ्या शेळ्या व दोन तीन मोठे बोकड बिबट्याने ठार केले. यात काही शेळ्या गाभण देखील होत्या.

    दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात एकूण दहा शेळ्या ठार होऊन संबंधित शेतकऱ्याचे दोन लाख रुपये पेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. वन खात्याने बिबट्याचा बंदोबस्त कायमस्वरूपी करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून नेहमीच होत आहे. परंतु बिबट्याच्या बंदोबस्त काही कायमस्वरूपी होताना दिसत नाही. नसबंदी सारख्या उपायोजनाला देखील शासनाकडून अद्याप हिरवा कंदील प्राप्त झालेला नाही.

 

जाहिरात

error: Content is protected !!