नारायणगाव : (प्रतिनिधी)
विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर( परिक्षेत्र कोल्हापूर) यांच्या वार्षिक तपासणी 2024 -25 अंतर्गत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांचे सहकारी यांनी नारायणगाव पोलीस ग्रामीणचे सर्व अभिलेख अद्यावत ठेवले असून सर्वतोपरीत चांगली कामगिरी केल्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. जनमानसात पोलीस दलाचा सन्मान वाढविण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांच्या या चांगल्या कारकिर्दीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी प्रशंसापत्र देऊन शेलार यांचा नुकताच गौरव केला आहे.
दरम्यान महादेव शेलार यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवला असल्याने सामान्य नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा उंचावलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेल्या व्यक्तीला त्यांच्याकडून चांगली वागणूक दिली जात आहे.
नुकताच नारायणगाव पोलीस ठाण्याला ISO ++ मानांकन प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे दर शनिवारी तक्रार निवारण दिन घेऊन लोकांच्या आलेल्या अर्जाचा निपटारा केला जात आहे.दरम्यान महादेव शेलार यांचा कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून सन्मान झाल्याबद्दल नारायणगाव पोलीस ठाण्याचे हद्दीमधील विविध मान्यवरांचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी व पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख यांजकडून सन २०२४-२०२५ साठी करण्यात आलेल्या वार्षिक तपासणीत पुणे ग्रामीण मधील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व त्यांचे सहकारी यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सर्व अभिलेख अदयावत ठेऊन सर्वोतोपरी चांगली कामगिरी करत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांस कडून राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात १०० पैकी १०० गुण मिळून पुणे ग्रामीण पोलीस दलात प्रथम क्रमांक पटकवात पोलीस दलाची प्रतिमा उंचावत जनमाणसात पोलीस दलाचा सन्मान वाढविल्याने त्यांना दि २९ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे या ठिकाणी उत्कृष्ट पोलीस स्टेशन हे प्रशसांपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.