जयहिंद शैक्षणिक संकुलात स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे निसर्ग निवास शिबिर संपन्न.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी)
जयहिंद इंटरनॅशनल स्कूल आणि जूनियर कॉलेज कुरण ता. जुन्नर येथील शाळेत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचे तीन दिवसीय निवासी शिबिर दि. २६ ते २९ एप्रिल २०२५ या कालावधीत संपन्न झाले.
निसर्गाच्या सानिध्यात राहून शील, बलवर्धन तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत निसर्गाशी मैत्री करून नैसर्गिक घटकांचे संवर्धन करणारे विविध उपक्रम शिबिरात सादर केले, तसेच विविध शारीरिक बौद्धिक व विकासात्मक दृष्ट्या प्रात्यक्षिके सादर केली. यादरम्यान संस्थेतील संचालक मंडळातील सदस्यांनी शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संचालिका अंजली गुंजाळ, इंदुमती गुंजाळ, शुभांगी गुंजाळ यांनी शिबिराचे उदघाटन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एस. गल्हे यांनी शिबीर तपासणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी कुकिंग, तंबू सजावट, एडवेंचर बेस, विविध गॅजेट्स, बनविले होते. शालेय जीवनात निवासी शिबिरातून निसर्गाच्या सानिध्यात कसे राहायचे व स्वतःची कामे स्वतः करुन त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होऊन ते भावी संस्कारक्षम नागरिक निर्माण होण्यास मदत होईल. स्काऊट गाईड शिक्षणाची आजच्या काळात आवश्यकता आहे पुढील जीवनात ते एक चांगले नागरिक घडतील यात काही शंका नाही असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट दिलीप नेवसे , जयहिंद शिक्षण संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका अंजली गुंजाळ, इंदुमती गुंजाळ, प्राचार्य डॉ. किरण पैठणकर व राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईडचे पालक व स्काऊट गाईड उपस्थित होते.राज्य पुरस्कार प्राप्त चार स्काऊट व चार गाईड यांचा स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढिल वाटचालीसाठी मार्गदर्शन केले, स्काऊट चळवळीचा इतिहास सांगितला तसेच राष्ट्रीय पातळीवरील विविध शिबिरांची माहिती दिली.
असे उपक्रम शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांना विविध पैलू पाडण्यासाठी महत्त्वाचे असून, असे विविध उपक्रम शाळेमध्ये वर्षभर राबवले जातात, अशी माहिती स्कूलचे प्राचार्य डॉ. किरण पैठणकर यांनी दिली व उपस्थित विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्काऊटर सुनील वाघमारे,अंकुश शिंदे , रोहित शिंदे, गाईडर रेशमा शेख, अमृता वाघुले यांनी मोलाचे योगदान दिले.

जाहिरात

error: Content is protected !!