नारायणगाव : (प्रतिनिधी)
मीना नदीला जनावरांना पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते प्रमोद खांडगे यांनी केली आहे. दरम्यान मे महिन्यामध्ये कालव्यात पाणी सोडले जाईल असे आश्वासन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर यांनी दिली असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
विना नदीवर असलेले सर्वच बंधारे आता कोरडे पडू लागले आहेत. या बंधाऱ्यावर अवलंबून असलेली शेतीची पिके करपू लागली असून जलसंपदा विभागाने तातडीने या बंदरात पाणी सोडावे असा रेटा शेतकरी वर्गाचा वाढला आहे. वडस पाण्याचा साठा शिल्लक असून तातडीने मीना नदीच्या पात्रात पाणी सोडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलन करावी लागेल असा इशारा प्रमोद घाडगे यांनी दिला आहे.
