पहलगाम हल्ल्याचा नारायणगाव मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध.

WhatsApp

नारायणगाव : ( प्रतिनिधी )
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भारतीय पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा येथील नारायणगाव येथे आज (दि.२५) रोजी दुपारी जुम्मा नमाज झाल्यानंतर मुस्लीम समाज बांधवांकडून जाहीर निषेध व्यक्त करत अतिरेक्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आल्याची माहिती मुस्लिम जमातचे सदर एजाज आतार यांनी दिली.

यानिमित्त एजाज आतार म्हणाले, पर्यटकांवर हल्ला केलेल्या अतिरेक्यांना शोधून सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच समाजात जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी असे म्हणत पहलगाम मध्ये पर्यटकांना मदत करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी गफुर तांबोळी, शफी खान यांनी पहलगाम घटनेचा निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर सरकारने कठोरात कठोर कारवाई करावी तसेच समाजात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकोपा ठेवावा अशी भावना व्यक्त केली.

यावेळी सदर एजाज आतार, गफूर तांबोळी, अली इनामदार, शफी खान, हाजी सलीम मोमीन, फरीद कुरेशी, आमिर तांबोळी, हमीद आतार, सलीम मणियार, अशफाक पटेल, सलीम मोमीन, छबू शेख, सज्जाद खान, शकील आतार, शौकत खान, इरफान काझी, रियाज मणियार, इस्माईल आतार, शहादत खान, भैय्या इनामदार, बादशहा शेख, फैजान शेख यांसह सुन्नी मुस्लिम जमातचे पदाधिकारी सदस्य व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

जाहिरात

error: Content is protected !!