नारायणगाव (प्रतिनिधी )वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या
उपसरपंच पदासाठी आज (दि 24)निवडणूक झाली असून उपसरपंच पदी प्रकाश गोविंद भालेकर यांची बिनविरोध निवड झाली.अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी दिली.
वारुळवाडी ग्रामपंचायतिच्या उपसरपंच रेखा फुलसुंदर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी उपसरपंच पदासाठी सरपंच विनायक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापैकी या वेळी 17 पैकी 16 सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी प्रकाश भालेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे,सरपंच विनायक भुजबळ, माजी सरपंच राजेंद्र मेहेर, देवेंद्र बनकर, सचिन वारुळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच प्रकाश भालेकर यांचा सत्कार करण्यात आला.
