नारायणगाव( प्रतिनिधी) जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पारगाव येथील प्रियंका मंगेश डुकरे (वय 19 वर्षे ) या विवाहित महिलेने बाजूला असलेल्या सुनील दत्तात्रय चव्हाण यांच्या मालकीच्या विहिरीत (दि. 20) आत्महत्या केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. दरम्यान विवाहित महिलेचा तिच्या पतीने घातपात केला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मंगेश डुकरे यास पोलिसांनी अटक केली असून 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
शेलार म्हणाले की ,याबाबत प्रियंकाचा भाऊ चेतन रवींद्र आगळे यांनी याबाबतची नारायणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, प्रियकांचा पती मंगेश दीपक डुकरे प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार शिवीगाळ करून मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्याच्या जासाला कंटाळूनच माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान प्रियंकाचा पती मंगेश दीपक डुकरे याच्यावर नारायणगाव पोलीस स्टेशनला87/2025 भारतीय न्याय सहिंता ( BNS ) 2023 कायदा कलम 108,115 (2)352,351(2)351(3) या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
