उष्णतेचा पारा वाढला.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी ) उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सूर्य अक्षरशः आग ओकीत आहे. त्यामुळे जीवाची लाही लाही होत असून अंगाला गारवा मिळावा म्हणून तरुण विहिरीमध्ये थंड पाण्यात अंघोळ करण्याचा आनंद घेत आहेत.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उन्हाळ्याची तोडता अधिकच आहे. यंदाच्या वर्षी तापमान अधिकचे असल्याने सकाळी नऊ वाजल्यापासूनच जीवाची लाही लाही होताना दिसते. शेतामध्ये काम करणारे मजूर त्यांना देखील या उन्हाचा मोठा त्रास होतोय. गेले तीन चार वर्षापासून कुणाची तीव्रता अधिकच वाढत चालली आहे. अजून पूर्ण मे महिना बाकी आहे. या महिन्यात अधिकचे ऊन असणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना कुणाचा मोठा त्रास होणार आहे. प्रत्येकाने आपले आरोग्याची काळजी या कालावधी नक्कीच घ्यायला हवी.
तीव्र उन्हापासून सुटकाकरून घेण्यासाठी तरुण मुले विहिरीमध्ये आंघोळ करून गारवा शोधीत आहेत.

जाहिरात

error: Content is protected !!