मरावे परी कीर्ती रुपी उरावे

WhatsApp

“मरावे परी कीर्ती रुपे उरावे” या उक्ती प्रमाणेच काल परवा आपल्यातून आपल्या गावचे जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमहत्व कै. धोंडिभाऊ (नाना )रघुनाथ खिलारी यांचे निधन झाले. गावच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी कायमच समाजातील गोर गरीब लोकांना मदत केली. माणूस हा समाजशील आहे. तो समाजाशिवाय राहूच शकत नाही. हे त्यांच्या अंत्यविधी आणि दशक्रिया कार्यक्रमाच्या दिवशी जमलेल्या गर्दी वरून दिसून आले. समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे हे स्वतः अंगीकारून तीच शिकवण त्यांनी आपल्या दोन्ही मुले रोहित शेठ आणि अविनाश यांना दिली. त्यांची ही आपले कुटुंब आणि व्यवसाय सांभाळून गावच्या विकासाप्रति असलेली तळमळ वेळोवेळी दिसून येते. म्हणूनच वडील गेल्यानंतर आपण काहीतरी समाजाचं देण लागतो या भावनेतून दोन्ही बंधूनी श्री चारणं बाबा मंदिरासाठी 1 लक्ष, गावच्या मुख्य चौकात 65000/-किमतीचा हाई मॅक्स, गावातील दोन्ही शाळांना देणगी स्वरूपात मदत केली. या पुढेही या परिवाराकडून अशीच सेवा घडेल यात कोणती शंका नाही. रोहित शेठ आणि अविनाश आणि संपूर्ण परिवाराच्या या दुःखात आपण सर्व जण सहभागी आहोत. कै. धोंडिभाऊ (नाना )खिलारी यांना आपणा सर्वाकडून भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏 ॐ शांती 🙏

जाहिरात

error: Content is protected !!