जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, कुरण येथील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत प्रथम पारितोषिक

WhatsApp

नारायणगांव : (प्रतिनिधी )जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, कुरण येथील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले, अशी माहिती प्राचार्य डॉ. डी.जे. गरकल यांनी दिली.
ही स्पर्धा दी इन्स्टिट्युट्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरर्स (IETE) पुणे केंद्र आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला विविध महाविद्यालयांमधून एकूण 45 प्रकल्प सादर करण्यात आले.
ही स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आली होती. पहिला टप्पा पुणे विद्यापीठातील विविध दहा महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 800 प्रोजेक्ट ग्रुप सहभागी झाले होते. यातील प्रत्येक कॉलेजमध्ये तीन विजेते ग्रुप अंतिम फेरीत सहभागी झाले. पहिल्या फेरीतील जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील पहिल्या तीन ग्रुपमध्ये या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक आला होता आणि पुढील अंतिम फेरीसाठी पात्र झाला होता.
अंतिम फेरीचे आयोजन आयईटीईच्या पुणे आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांनी केले होते. उद्योगजगतातील विविध तज्ञ परीक्षक म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची, नवीन तंत्रज्ञान आणि उद्योगातील आव्हाने समजून घेण्याची तसेच नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची संधी मिळाली. यामुळे त्यांना कठीण समस्यांकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याचे व त्यावर उपाययोजना शोधण्याचे योग्य मार्गदर्शन लाभले.
फिंगरप्रिंट वेहिकल स्टार्टर या जयहिंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या आदिती मोढवे, तनुजा फदाले, निखिल विधाटे, विठ्ठल कोळी यांनी सादर केलेल्या प्रकल्पास प्रथम क्रमांक म्हणून रोख रक्कम रुपये 5000 मिळाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी ,डॉ. डी. एस गल्हे,प्राचार्य डॉ. डी.जे. गरकल आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. व्ही. एम. धेडे यांनी अभिनंदन केले.
या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर. एम. मूळजकर, आय इ टी इ समन्वयक प्राध्यापक एस इ शिंदे व मार्गदर्शक प्राध्यापक एस डी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

error: Content is protected !!