
नारायणगाव : विघ्नहर टाइम्स
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची मार्च अखेर बँक पातळीवरील कर्जाची शंभर वसुली करण्यात यश मिळाले आहे. आज पहिल्याच दिवशी पुणे जिल्हा बँकेच्या वतीने सोसायटीच्या सुमारे नवशे सभासद शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष खैरे यांनी दिली. नारायणगाव सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ सोसायटीचे अध्यक्ष संतोष खैरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, व्यवस्थापिका जयमाला काळे, उपाध्यक्ष किरण वाजगे,संचालक सिताराम खेबडे,राजेंद्र पाटे, कैलास डेरे,सिमा खैरे,रामदास तोडकरी, अरुण कोल्हे,चंद्रकांत बनकर,सचिव गणेश गाडेकर,विकास तोडकरी, दादाभाऊ खैरे, संजय खैरे आदि मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. सोसायटीचे अध्यक्ष खैरे म्हणाले नारायणगाव ही तालुक्यातील मोठी सोसायटी आहे. सोसायटीच्या वतीने सुमारे 32 कोटी रुपयांचे दीर्घ मुदत, वाहन, पीक कर्ज वाटप सभासद शेतकऱ्यांना करण्यात आले होते. यापैकी 22 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप खरीप हंगामात करण्यात आले होते. मार्च अखेर सुमारे बारा कोटी रुपयांची पीक कर्जाची वसुली झाली आहे. कर्जमाफीच्या सरकारच्या धोरणाचा परिणाम कर्ज वसुलीवर झाला आहे. मात्र बँक पातळीवरील कर्जाची शंभर टक्के वसुली करण्यात यश मिळाले आहे.केंद्र शासनाच्या वतीने बहुउद्देशीय इमारत बांधकामासाठी नारायणगाव सोसायटीला तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असून पुढील सहा महिन्यात पुर्ण केले जाईल. व्यवस्थापिका काळे म्हणाल्या सलग सुट्ट्या आल्या जरी असल्या तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी गैरसोय केली जाणार नाही. जास्त कर्ज पुरवठा करणारी नारायणगावची सोसायटी मोठी असून शेतकऱ्यांच्या मागणी नुसार आज पासून खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप सुरू केले आहे. यावेळी उपसरपंच पाटे, सचिव गणेश गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.