
वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.रेखा फुलसुंदर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार? याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.
उपसरपंच पदासाठी राजश्री विशाल काळे, नारायण वामन दुधाने,प्रकाश गोविंद भालेकर व संगीता दत्तात्रय काळे या चौघांच्या नावांची चर्चा होत असली तरी राजश्री विशाल काळे अथवा प्रकाश गोविंद भालेकर या दोघांपैकी एकाच्या गळ्यामध्ये उपसरपंच पदाची माळ पडू शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान नव्याने उपसरपंच पदाची संधी ज्या व्यक्तीला मिळेल त्या व्यक्तीला किती कालावधीसाठी उपसरपंच पदाची खुर्ची मिळेल? याबाबतही वेगवेगळी चर्चा होताना दिसत आहे. तसेच उर्वरित काळासाठी दोघांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पहिली संधी कोणाला मिळणार व शेवटी कोणाची उपसरपंच पदावर वर्णी लागणार? याबाबत सुद्धा उत्सुकता वाढली आहे.