फुल माळी ने नारायणगावच्या लाल मातीतील कुस्ती पटकावली.
हनुमान जयंती निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्याला मोठ्या प्रतिसाद. अंतिम कुस्ती राहुल फुलमाळीने हनुमान केसरी किताब पटकवला.
नारायणगाव :
हनुमान जयंती निमित्त येथील श्री हनुमान, विठ्ठल,दत्त,महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या लाल मातीवरील कुस्त्यांच्या आखाड्यात पुणे,नगर जिल्ह्यातील सुमारे 180 नामवंत पैलवानांनी भाग घेतला. ऐंशी कुस्त्या निकाली झाल्या. निकाली कुस्ती करणाऱ्या पैलवानांना दोन लाख रुपयांचा इनाम रोख स्वरूपात वाटप करण्यात आला. मानाची अंतिम कुस्ती पैलवान राहुल फुलमाळी(पिंपळवंडी,ता.जुन्नर) विरुद्ध शिवाजी उचळे (शिरपूर ता.पारनेर) यांच्यात झाली. लाल मातीत सुमारे अर्धा तास रंगलेली ही कुस्ती अखेर शिवाजी उचळे याला चितपट करून ही कुस्ती राहुल फुलमाळी यांने जिंकली. हनुमान केसरी हा किताब पैलवान राहुल फुलमाळी याने पटकवला.या वेळी उपस्थितांनी शिट्ट्या व टाळ्या वाजवून दाद दिली. शैलेश औटी यांच्या वतीने चांदीची गदा तर खंडू पवार यांच्या वतीने अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन फुलमाळी यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.आशी माहिती हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शिवदास तांबे यांनी दिली. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह,भजन, महाप्रसाद व कुस्त्यांचा आखाडा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सुमारे दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ दरम्यान येथील श्रीवत मैदानात कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. नुरा कुस्त्या टाळण्यासाठी आयोजकांनी निकाली कुस्तीची आट घालण्यात आली होती.कृष्णा झंझाड,राम सुरडकर, नवनाथ चौरे, मपुर शिंदे,अक्षय चक्रवर्ती (दिल्ली), मयुरेश करवंदे, कनक मेडशिंगे, तानाजी फुलमाळी या पैलवानाच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.भाजप नेत्या आशा बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे,उपसरपंच योगेश पाटे, राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष दिनेश ओसवाल,उपाध्यक्ष, राजेंद्र सांडभोर, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक डॉक्टर संदीप डोळे, सरपंच डॉ.शुभदा वाव्हळ,सरपंच विनायक भुजबळ, आशिष माळवदकर,रामदास अभंग,मकरंद पाटे, संतोष दांगट,संतोष वाजगे, ज्ञानेश्वर औटी, आशिष फुलसुंदर, भागेश्वर डेरे, हेमंत कोल्हे यांच्या हस्ते विजेत्या पैलवानांना इनाम देण्यात आला.कुस्ती आखाड्यात पंच म्हणून क्रीडा मार्गदर्शक एच.पी.नरसुडे, आशिष कोल्हे, राहुल नवले,विनायक औटी,अजय कानडे, दादाभाऊ कोठाळे,रवी शिंदे,शैलेश कावळे,मेहबूब काझी यांनी काम पाहिले. कुस्त्यांचा आखाडा व यात्रा महोत्सवाचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शिवदास तांबे, उपाध्यक्ष- राजकुमार कोल्हे,खजिनदार बाळासाहेब बनकर, सचिव रत्नाकर सुबंध, सहसचिव नवनाथ खेबडे, सदस्य सागर दरंदाळे, विनायक डेरे, शैलेश, गजानन औटी, गोपीनाथ मेहेर, सतिश वारूळे, शशिकांत बनकर यांनी केले.
