
नारायणगाव :
उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव येथील मुक्ताई व काळोबा देवाची यात्रा उत्सव 24 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 रोजी होणार असून आज (13) कांबळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ताई मंदिरामध्ये मुक्ताई देवीची विधिवत पूजा करून मंदिरामधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढून बस स्थानकाजवळ असलेल्या कांबळा बैठकीच्या कार्यालयामध्ये ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली. यंदाच्या वर्षी तमाशा सात दिवस सुरू राहणार असून हे सगळे तमाशे प्रायोगिक तत्त्वावर मुक्ताई गार्डन मंगल कार्यालयात होणार होणार आहेत जर यात काही अडचण आली नाही तर दरवर्षी याच ठिकाणी तमाशा भरवण्यात येईल असे यावेळी ठरवण्यात आले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष होण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याने यंदाच्या वर्षी यात्रा कमिटीचा स्वतंत्र अध्यक्षनेमण्याऐवजी संपूर्ण यात्रा कमिटीच यात्रेचे नियोजन करील असे संतोष खैरे यांनी सुचना मांडली. व त्यांच्या सूचनेला सर्वांनी मान्यता दिली. तसेच मोठ्या पाळण्याचे दर यात्रा संपेपर्यंत एकसारखे शंभर रुपये ठेवण्याचे यावेळी ठरवण्यात आले. तसेच कांबळ्याच्या बाजूला ट्रस्ट असलेला गाळ्याचा लिलाव संतोष पाटे यांना 18 हजार रुपयांना देण्यात आला. तसेच प्रत्येक घरटी वर्गणी 600 रुपये समान ठेवण्यात यावी असे यावेळी ठरविण्यातआले. नारायणगाव परिसरामध्ये विविध व्यवसाय करणारे दुकानदार यांच्याकडे वर्गणी मागायला जावे लागते मात्र यंदाच्या वर्षापासून सगळ्या दुकानदारांनी कांबळ्यावर आणून वर्गणी भरावी असे ठरवण्यात आले.तसेच यात्रेच्या काळामध्ये गावातील एखाद्या ग्रामस्थांनी यात्रेत गोंधळ घातल्यास कोणत्याही नेत्याने पोलीस ठाण्याला फोन करू नये पोलीसांना त्यांच्या पद्धतीनं कारवाई करण्याची मुभा देण्यात यावी असेही बैठकीत ठरले . तसेच यात्रेच्या काळामध्ये दुकाने व हॉटेल लवकर बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी दुकानदारांना देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला. संतोष वाजगे यांच्या वतीने यात्रा परिसरामध्ये एखादा अपघात, जळीत अथवा कोणाचा मृत्यू झाल्यास चार कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. त्यांच्या विम्याचे तिसरे वर्ष आहे. यात्रेच्या काळामध्ये फडमालक मोफत तमाशाचे कार्यक्रम करीत असतात. त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना मानधन म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच शोभेचे दारू काम करणाऱ्यांच्या मानधनात देखील वाढ करण्यात आली असून चाळीस हजार रुपये मानधन देण्याचे ठरले. यावेळी मुक्ताई देवी ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष बाबू पाटे, मुक्ताई समाज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खैरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, विलास पाटे, राजाराम पाटे, विकास तोडकरी, संतोष वाजगे, अशोक पाटे एकनाथ शेटे, सुजित खैरे, मुरली फुलसुंदर, प्रल्हाद पाटे राजाराम पाटे, डी. के. भुजबळ, सचिन खैरे,अजित वाजगे, आरिफ आतार, दादाभाऊ खैरे, जयेश कोकणे राजाभाऊ माताडे, फुलसुंदर, ईश्वर पाटे, पप्पू भूमकर अक्षय खैरे, रामदास अभंग, मुकेश वाजगे आदी उपस्थित होते. दरम्यान यात्रे काळामध्ये यात्रा परिसरात एखादा अपघात झाल्यास संतोष वाजगे यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपयांचा विमा उतरवला जात असून त्यांच्या विम्याचे तिसरे वर्ष असल्याने यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक जगदेव पाटील यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.