खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बबनराव थोरात यांच्या कुटुंब यांचे केले सांत्वन.

WhatsApp

नारायणगाव (प्रतिनिधी)

स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांचे गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी दुःखद निधन झाले श्री नारायण अर्जुन थोरात यांचा सामाजिक प्रवास मुंबई शहरातून सुरू झाला व्यवसायानिमित्त मुंबई शहरामध्ये लालबाग चिंचपोकळी परिसरात वास्तव्यास असताना सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी चांगला ठसा उमटवला तर नंतर मूळ गाव शिरोली खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे शेती सांभाळून शिरोली खुर्द गावचे उपसरपंच पद भूषविले जुन्नर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय सहभाग घेतला मृत्यूसमयी त्यांचे वय 89 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई नारायण थोरात,मुलगा शिवसेना उपनेते श्री.बबनराव थोरात मुलगी सौ.मंगल विकास कवडे व सौ.साधना अर्जुन शिंदे सुनबाई सौ.संगीता बबनराव थोरात भाऊ श्री.मारुती अर्जुन थोरात श्री.गुलाब अर्जुन थोरात श्री.परशुराम अर्जुन थोरात. बहिणी स्वर्गीय कौसाबाई शंकरराव शिंगोटे सौ.चांगुनाबाई रामदास डुंबरे सौ.राधाबाई मुरलीधर मोरे सौ.शोभा बाळशिराम गवांदे. असा मोठा परिवार आहे श्री.नारायण अर्जुन थोरात यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त करून शिवसेना उपनेते बबनराव थोरात यांचे सांत्वन केले. तसेच शिवसेना नेते खासदार श्री संजय राऊत श्री विनायक राऊत श्री अनिल देसाई आणि विरोधी पक्ष नेते माननीय नामदार श्री अंबादास दानवे यांनी देखील सांत्वन केले आहे शिरूर लोकसभा संघाचे मतदार संघाचे खासदार माननीय श्री. अमोल कोल्हे यांनी थोरात यांच्या श्रीमानयोगी निवासस्थानी जाऊन थोरात कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत विविध पक्षाचे जिल्हाप्रमुख तालुका अध्यक्ष आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय नारायण अर्जुन थोरात यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता कुकडी नदी तीरावर मुक्काम पोस्ट शिरोली खुर्द तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होणार आहे. चिंतन केसरी ह भ प भरत महाराज थोरात यांची प्रवचन सेवा आहे.

जाहिरात

error: Content is protected !!